फ्लॅशबॅक
रूबाहेरील चाळीतील मोकळी जागा. प्रसंगाची वेळ 10am ( सकाळ)
( अशोक आणि दौलत यांच्यात संवाद चालू आहे, अशोकचा छोटा मुलगा रवी तिथेच खेळत आहे, चाळीत एक लहान दुसरी मुलगीही ( गौरी) तिथे खेळत आहे .)
दौलत और, क्या सब बढ़िया?
अशोक हां आता बढ़ियाच दौलत मियां.
दौलत आज रविवार को सुट्टी ना तुम्हाला? ( मराठी हिंदी मिक्स शब्द बोलतो.)
अशोक हो.
दौलत और नवीन कुछ?
अशोक नवीन काही नाही, घराच्या लोनसाठी प्रयत्न करतोयं बघू आता.
दौलत बढ़िया है फीर, तुमको नंतर टेन्शनचं नाही कशाचं?
अशोक संसार एकदा चालू झाला की, टेन्शन पाठ सोडत नसतं.
दौलत वो भी खरचं आहे म्हणा! पण बघा ना तुमच्या गोड मुलाकडेच बघा आता.
( दोघेही मोकळ्या जागेत खेळणाऱ्या रवी व गौरीकडे पाहतात, अशोक मुलाला पाहून थोडसं स्मितहास्य करतो.)
दौलत कैसा है, अभी तुम, पुरा संसारी झाला.
अशोक पुरा संसारी, नशीब संसारात पुरा बुडालो असं नाही म्हणलात.
( हसतो.)
दौलत वहीच हो, लग्न झालं, मुलगा आहे आता तो शिकेन, मोठा होईल वगैरे वगैरे आणि झालचं ना आता राहिलंच काय सगळ्यात.
अशोक राहिलयं हो वन बीएचके घ्यायचं स्वप्न, करू तेही लवकर पूर्ण.
दौलत होंगा ना, नक्कीच.
( तेवढ्यात अशोकला फोन येतो, तो फोनवर बोलत तिथून घराच्या दिशेने निघून जातो.)
प्रसंग समाप्त