फ्लॅशबॅक
Ext. रूम बाहेरील चाळीतील मोकळी जाग. प्रसंगाची वेळ 11am.
( सखू आणि दौलत गप्पा मारत आहेत.)
दौलत मग क्या म्हणत्या सखुबाई?
सखू काय म्हणायचं दौलत मियां. चाळीत काही लोकं लयचं मागून येऊन तिखट व्हायलेत.
दौलत उतना तो होणारचं ना. पर हर किसी थोडा अपनी औकातपर रहना चाहिए.
सखू तेच ना, तसचं म्हणते मी, पण जाऊ द्या असत्या एकेकाला खोडी.
दौलत वो निशा चं लग्न जमायलं म्हणे?
सखू हो, जमू दे बाई, एकदाची चिचुंदरी जाईल चाळीतली.
( ते ऐकून दौलत हसतो.)
( तेवढ्यात निशा सखूच्या पाठी येऊन ऊभी राहते निशा तिचं बोलणं ऐकते.)
दौलत क्या बोले उसको? चिचुंदरी... ( हसतो.)
( दौलत निशाला पाहून मुद्दाम परत शब्द बोलतो.)
सखू मग काय? किती कीरकीर करत असते चाळीत अख्या.
दौलत हौ ना, खरचं है तुम्हारा. मै चलता अब.
( दौलत निघून जातो. सखू मागे वळून पाहते तर निशा रागाने तिच्याकडे पाहत असते.)
निशा ए म्हशे, मला चिचुंदरी म्हणती का तू आं??
सखू अगं नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. ( थोडासा चेहरा पाडून.)
निशा आयो जाऊ द्या, चालतयं तेवढं ( रागाचा चेहरा हसरा करत सखूला गळ्याला गळाभेट करते.)
प्रसंग समाप्त