फ्लॅशबॅक
आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 5.30pm.
( अशोकने रवीला नवीन ड्रेस आणला आहे, रवी खुप खुश आहे, अशोक, रमा सर्वच खुश आहेत, रवी अभ्यासात हुशार आहे.)
( रवी अभ्यास करत काॅटवर बसला आहे. तेवढ्यात अशोक बाहेरून येतो, रमा रवीच्या बाजूलाच बसली आहे, अशोक येताच ती उठून त्याला पाणी देते, तिघे काॅटवर बसतात, अशोकाच्या हातात पिशवी आहे.)
अशोक हा ( श्वास सोडत), खुप दमलो आज.
रमा धांदल होती की काय कामावर आज?
अशोक हो धांदल होतीच पण एक कामही होतं तर जरा मार्केटमधून फेरफटका मारुन आलो.
रमा अच्छा.
रवी बाबा, शाळेत एक नंबर आहे मी सध्या, मॅडमनी वहीत लिहून पण दिलयं बघा.
अशोक वा, बघू.
( रवी एक वही अशोकला दाखवतो, वहीत बघून अशोक वही परत रवीजवळ देतो.)
अशोक मस्त, छान असाच अभ्यास करत पुढे जा, खुप मोठा हो.
रमा खोड्या काय कमी करतो का? कशाचा हुशार मला तर नाही वाटतं.
अशोक अगं रमे, मुलांना असं नकारार्थी नसतं बोलायचं, त्यांची नंतर अभ्यास करताना ऊर्जा कमी होते अशाने, त्यांना वाटतं जाऊ द्या नाही केला तरी कुठे काय फरक पडणारयं?
रमा आणि जास्त स्तुतीपण नसते करायची, मुलं फुशारतात.
अशोक बरं, कळलं. रवी तुझ्यासाठी नवा ड्रेस आणलायं, अशोक पिशवीतून काढून दाखवतो.
रवी वा, छान आहे. मी आलोच. मित्रांना दाखवून.
( रवी ड्रेस घेऊन बाहेर चाळीत मित्रांना दाखवायला निघून जातो.)
रमा अरे हळू जा, पडशील.
( अशोक रवीच्या घराबाहेर जातानाच्या पाठमोर्या आकृतीकडे दरवाजाकडे पाहत राहतो.)
रमा अहो, काय गरज नव्हती इतक्यात?
अशोक अगं त्यावर टोकणं लागलयं, तब्बल 2500 (अडीचं हजरांच.)
रमा काय सांगताय? देवच पावला. ( देवाला हात जोडते.)
अशोक अशे टोकण लागून, थेंबा थेंबाचं टोकण लागून बघु जमलं तर असाघं घेऊ वन बीएचके. ( हसतो.)
रमा घेऊ आपण एक दिवस नक्कीच.
( रमा अशोकच्या हातावर हात ठेवते. दोघे समाधानी आहेत.)
प्रसंग समाप्त