फ्लॅशबॅक
आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 5pm (सायंकाळ.)
( रवीच्या लग्नासाठी रमा व अशोकने स्थळ पाहिलयं.)
रमा रवी लग्नासाठी एक स्थळं आलयं बघं.
रवी इतक्या लवकर काय गरजयं?
अशोक अरे एकदा फक्त मुलगी बघून घे, नंतर तुला कधी करायचं असेल तेव्हा कर.
रवी अहो एवढी घाई करायला मी बाहेरची एखादी उचलून नाही आणनारयं.
रमा अरे खरयं तुझं पण बघून घे, लवकर लग्न केलेलं चांगल असतं कधीपण.
अशोक थांब रमा एकच मिनीट.
( अशोक खिशातून एक फोटो काढून तो फोटो रवीला दाखवतो.)
रवी ( फोटो बघायच्या आधीच) आत्ताच जाॅबला तर लागलोय मी, तो फोटो नका दाखवू राहू द्या.
रमा खरचं नाही बघायचा फोटो? पोरगी तर अप्सरा दिसतेयं.
( असं म्हणतं रमा थेट रवीच्या डोळ्यांसमोर फोटो धरत त्याला फोटो दाखवते.)
रवी अरे, छान आहे खुपच, जाऊ पहायला. आलोच मी जरा.
( रवीच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं तो घराच्या बाहेर निघून जातो.)
प्रसंग समाप्त