आतल्या बाजूस. आॅफीस/मोठी कॅबीन/हाॅल. प्रसंगाची वेळ 12pm.
( एका सभागृहासारख्या ठिकाणी किंवा मोठ्या हाॅलमधे खुर्च्यांवर खुप सारे लोकं बसले आहेत, त्यांच्या समोर लकी ड्राॅ स्पर्धेचे दोन आयोजक बसले आहेत, बाकी ज्यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित केली होती त्यांची ४-५ मंडळी तिथेच लोकांमधे आजूबाजूला ऊभी आहेत. रमा, गौरी खुर्चीवर जराशा तणावात बसल्या आहेत तितक्यात अशोकही तिथे येतो आणि तो रमाच्या बाजूच्या खुर्चीत बसतो.)
रमा ( मनात) काय होईल? देवा यावेळी काहीतरी कर, नाहीतर उगाच यांचा राग अनावर व्हायचा आज माझ्यावर.
गौरी ( मनात) काय होईल, जर नाही मिळालं तर काका; काकू आणि माझ्यावरही रागावतील, खुप टेन्शन आलयं.
अशोक (मनात) काय होणारयं कुणास ठाऊक?
( तेवढ्यात समोरून एक आयोजक)
आयोजक आता पहिल्या बक्षिसाची घोषणा करायची वेळ आलीये, वन बीएचके ज्यांना मिळणार आहे ते आहेत मिस्टर अशोक.
अशोक बघं रमा बोललो होतो ना आपल्या नशीबात नसणार म्हणून
रमा हो ना, मला वाटलेलं भेटेल आपल्याला.
गौरी ( स्वत: ओठात पुटपुटते.) टोकण काकांना यावेळी तरी मिळायला हवं होतं यार, किती चांगले राहतात ते सर्वांसोबत, शिट यार!
अशोक चला उठा आता इथून, मला थांबायची बिल्कूल ईच्छा नाही.
रमा अं हो, ए चल गौरी.
( अशोक, रमा व गौरी उठून चालू लागतात तेव्हा एक मुलगी जवळ येते.)
ती मुलगी काकू, तुमचचं बक्षीस आहे, समोर स्टेजकडे जा मागे का चाललायं?
रमा म्हणजे?
ती मुलगी काल तुम्ही खरेदी केली मग मी माहिती भरून घेताना तुम्ही तुमच्या मिस्टरांच नाव सांगितलं ना "अशोक".
( तेवढ्यात बाकीचे लोकं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला लागतात.)
गौरी ( जरा मोठ्या आवाजात.) अरे, टोकण काका तुमचचं नाव अशोक आहे, मी कसकायं विसरले यार!
रमा अहो, मीही विसरलेले, चला तिकडे स्टेजकडे.
अशोक अरे हो, मीच माझी स्वत:ची ओळखचं विसरलेलो...
( रमाच्या, अशोकच्या गौरीच्या चेहऱ्यावर आनंद आहे.)
( गौरी खाली बसते. रमा व अशोक स्टेजवर जातात, त्यांचा तिथे छोटासा सत्कार केला जातो, फोटो काढले जातात.)
रमा ( अशोक कडे पाहून हसत हसत.) म्हटलं नव्हतं प्रारब्धाच्या गोष्टी असतात.
( अशोक ही स्माईल करतो.)
प्रसंग समाप्त
कथा समाप्त