लीन हार्पर हि बारा वर्षीय मुलगी ९ जून, १९५९  साली आर.सी.ए.एफ. स्टेशन, क्लिंटन, ओंटारिओ वरून हरवली होती. ती हरवलेली त्या नंतर दोन दिवसांनी तीचे मृतशरीर एका शेतात सापडले. पोलिसांच्या तपासात असे कळले कि, त्या बारा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाला होता. त्यानंतर तिच्याच कपड्याने तिचा गळा दाबण्यात आला होता. लीनचा जन्म ३१ ऑगस्ट,१९४६ साली न्यू ब्रुन्सविक या शहरात झाला. त्या शहरात तिला सामाजिकरीत्या सतत अग्रेसर असणारी मुलगी म्हणूनच ओळखले जायचे. ती आपला मोकळा वेळ मुलींचे स्काऊट गाईड, बायबल क्लास, रविवारची शाळा यामध्ये घालवत असे.  लीन त्या दिवशी एअर वाईस मार्शल ह्युग कॅम्पबेल स्कूल मध्ये जाणार होती. लीनच्या वर्गमित्रांपैकी स्टीवन ट्रूस्कॉट याने तिला शेवटचे पहिले होते. ट्रूस्कॉट याने तिला आपल्या सायकलवर समोरच्या आडव्या दांड्यावर बसवले होते. त्याने तिला सायकलने डबलसीट सोडले होते. ट्रूस्कॉटवर उच्च न्यायालयात खटला भरला गेला होता. त्यावेळी त्याने आपल्या जबाबात सांगितले कि, त्याने लीनला हायवे नंबर ८ आणि कंट्रि रोडच्या चौकात सोडले होते. कोर्टाने ट्रूस्कॉट दोषी असल्याचे सांगितले.त्यानेच लीनवर अतिप्रसंग केला आणि तिचा गळा आवळून मारले असं लीनच्या वकिलांचं म्हणणे होतं. ह्या आरोपाचे उत्तर म्हणून ट्रूस्कॉटने न्यायालयात सांगितले कि, "त्याने लीनला त्या चौकात सोडल्यावर ती एका गाडीत बसून निघून गेली होती"

ट्रूस्कॉटला १२ जून रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. १३ जूनला त्याला लीनच्या हत्येसाठी शिक्षा सुनावण्यात आली. १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत त्याचा खटला चालला आणि सरते शेवटी त्याला अपराधी म्हणून शिक्षा सुनवण्यात आली. ट्रूस्कॉटने तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून अनेकदा न्यायालयाकडे शिफारस केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली तरी त्याचा काही फायदा झालं नाही. ट्रूस्कॉटला मृत्युदंडाची शिक्षा झाली.

२१ ऑक्टोबर १९६९ साली त्याच्या शिक्षेत काही कारणास्तव फेरबदल करण्यात आला आणि त्याला काही काळासाठी तो देश सोडून कुठेही पळून जाणार नाही या अभिवचनावर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली.

२००० साली एका टीव्ही  चॅनेलने लीन हार्परच्या प्रकरणात जास्त रस घेतल्याने त्याची केस परत उघडण्यात आली. लीनच्या पुरलेल्या शवाला बाहेर काढून त्याचे परत शवविच्छेदन करायचे प्रयत्न झाले .यातून दुसरे काही पुरावे मिळतात का याची  चौकशी चालू झाली. पुराव्याअभावी ट्रूस्कॉटची निर्दोष सुटका करण्यात आली. कोर्टाच्या मते, पुरावे ट्रूस्कॉटला मृत्यूदंडाची शिक्षा साठी पुरेसे नव्हते. तरीही लीन हार्परच्या आई-वडिलांना अजूनही ट्रूस्कॉट हाच खुनी आहे यावर विश्वास आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel