बंगालसह भारताचा मध्ययुगीन इतिहास म्हणजे मुघल साम्राज्य, आक्रमण, लूटमार, सांस्कृतिक सुधारणा आणि वास्तुविशारद यांनी समृद्ध आहे.
मुघल साम्राज्य
खिलजी राजवंश, माम्लुक सल्तनत, तुघलक सल्तनत, इलियास शाही, सूरी साम्राज्य यांच्या यवन ध्वजाखाली इस्लामी राज्यकर्त्यांनी बंगलाचे वैभव लुटले. यांच्या सततच्या आक्रमणामुळे राज्यकारभाराला धोका निर्माण झाला आणि बंगालची सामाजिक-राजकीय, सांकृतिक अखंडता गंभीर संकटात सापडली होती.
मुघल सुभेदार
मुघल साम्राज्यातील सहयोगी आणि सेनापती यांच्यात जिल्हे किंवा सुभे वितरित केले गेले. अकबर, जहांगीर आणि औरंगजेब यासारख्या मुघल सम्राटांनी बंगाल प्रांताबद्दल मृत्यूशैय्येवर असताना आदर व्यक्त केला होता. या त्रिभुजप्रदेशामुळे लाभलेल्या भौगोलिक श्रीमंतीची त्यांना जाणीव नव्हती. ह्या श्रीमंतीचे संवर्धन करण्याऐवजी त्यांनी नेहमीच ती लुबाडली होती.
नवाबांचा दुवा
मुघल सम्राट बहादूर शाह प्रथम याच्या कारकिर्दीत मुरशीद कली खान उर्फ अल-उद-दौलाह बंगालमधील शेवटचा मुघल सुभेदार होता. दक्खन भारतात हिंदू घरात जन्मलेला हा मुलगा मुघलांच्या जुलुमामुळे इस्लाम धर्मिय झाला होता. त्याकाळी मुघलांच्या अमानवी कृत्यांना घाबरून अनेक हिंदूंनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. या मुर्शिदने बंगालचा नवाब म्हणून गादी घेतली. त्याने शशांकच्या कर्णसुवर्ण प्रदेशाचे नाव मुर्शिदाबाद असे ठेवले.
कोच राजवंश
स्वातंत्र्यानंतर बंगालच्या राजकीय नकाशामध्ये कूचबिहार हे रियासत समाविष्ट केले गेले. पूर्वी बंगालच्या उत्तर भागावर कोच राजवंश होता. कोच राजांचा प्रसिद्ध राजवाडा अजूनही कूच बिहार शहरात आहे.
मराठ्यांचे आक्रमण:
अठराव्या शतकात मुर्शीद कली खानच्या मृत्यूनंतर राजकीय गोंधळा दरम्यान ,मराठा साम्राज्याने बंगालवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. नागपूरचे मराठा महाराज रघुजी यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याच्या मदतीने ओडिशा आणि बंगालच्या भागांवर हल्ला करण्यात आला. परंतु संपूर्ण प्रांत त्यांनी काबिज केला. बंगाल 'बार्गी' हा शब्द मराठा लुटारु अश्या संदर्भाने वापरतात. पश्चिम बंगालमध्ये वापरला जाणारा एक सामान्य शब्द आहे. जो लहान मुलांच्या अंगाईमध्येही वापरला जातो.
प्लासिची लढाई आणि ब्रिटिश
ब्रिटीश हे आधीपासूनच केवळ स्वार्थासाठी देशोदेशीची संपत्ती लुटत. भारतात घुसखोरी करण्याची एक उत्तम जागा, एका मजबूत नौदलाची उपस्थिती, एक श्रीमंत परंतु कमकुवत शासन असणारा राज्यकारभार, समृद्ध त्रिभुजप्रदेशाची एक जमीन याची हाव ब्रिटिशांना सुटली होती. त्यामुळे भारतावरच्या ब्रिटिशांच्या अक्रमणासाठी हि एक संधी होती. प्लासिच्या लढाईने ब्रिटिशांना बंगालवर त्यांची सत्ता आणि अधिराज्य गाजवण्याची संधी मिळाली. या सगळ्या नाट्यमय विजयाची मेढ ब्रिटिशांनी केलेल्या विश्वासघाती कटावर रोवली गेली होती. मिर्झा मुहम्मद सिराज उद-दौलाह, बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब होता. त्याने ब्रिटिशांना बंगालमधील रेशीम आणि जुट विकत घेण्यास आणि त्याचा वयावर करण्यासाठी व्यावसायिक परवाना दिला. ब्रिटिशांनी सिराजच्या मंत्रीमंडळात लाच देऊन फुट निर्माण केली आणि त्यांना नवाबच्या विरोधात उभे राहण्यास सांगितले. सिराज उद-दौलाहला त्याच्याच विश्वासु मीर जाफर आणि इतर मंत्र्यांनी फसवले होते. तो प्लासिची लढाई तो हरला. अश्याप्रकारे बंगाल पाश्चात्त्य आक्रमकांच्या घशी उतरला.