अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे नेतृत्व सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करीत आहेत. २०१९ निवडणुकानंतर, लोकसभेतील सध्या २० जागांसह चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. सव्वीस वर्षांहून अधिक काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य राहिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी "तृणमूल काँग्रेस" स्थापित केला. निवडणूक आयोगाने पक्षाला जोरा गवताचे फुलचे विशिष्ट प्रतीक दिले. निवडणूक आयोगाने ए.आय.टी.सी.ला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. डिसेंबर २००६ मध्ये, नंदीग्रामच्या लोकांना हळदिया विकास प्राधिकरणाने नोटीस दिली की, “नंदीग्रामचा मोठा भाग ताब्यात घेतला जाईल आणि सत्तर हजार लोकांना त्यांच्या घरातून हाकलून देण्यात येईल.”
लोकांनी या भूसंपादनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आणि तृणमूल काँग्रेसने या आंदोलनाचे नेतृत्व केले. भूमी उच्छेद प्रतिरोध समिती (बीओपीसी) जमीन बळकावण्याच्या व बेदखल करण्याविरोधात स्थापन करण्यात आली. १४ मार्च २००७ रोजी पोलिसांनी गोळीबार केला आणि चौदा ग्रामस्थांना ठार केले. त्यातलेच काही बरेच बेपत्ता झाले. इतर माध्यमांनी असा दावा केला आहे आणि ज्याला केंद्रीय अहवालात त्याचे समर्थन देण्यात आले होते. असा दावा केला आहे की नंदिग्राममधील पोलिसांसमवेत सशस्त्र कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) कार्यकर्त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. अनेक विचारवंतांनी रस्त्यावर निषेध केला आणि या घटनेने नवीन चळवळीला जन्म दिला. एस.यू.सी.आय.(सी)चे नेते नंदा पात्रा यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. इथे केलेला गोळीबार हा फक्त कम्युनिस्ट पार्टीने केलला होता कि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी? हा एक प्रश्न आहे. यावर्षीच्या रक्तरंजित निवडणुकांनंतर हा प्रश्न उद्भवणे साहजिक आहे. कम्युनिस्ट पक्षाला हरवून टी.एम.सी.नेही काही वेगळे केले नाही. नंदीग्रामचा बालेकिल्ला यावर्षीच्या निवडणुकानंतर हातातून गेल्यावर टी.एम.सी.ने केलेली हिंसा भा.ज.पा.वर ढकलत आहेत. हे म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होट आहे असे दिसते. स्थापनेपासूनच हा पक्ष पश्चिम बंगालमधील कम्युनिस्टविरोधी चळवळीत अग्रेसर आहे. स्वतः कम्युनिस्टवादाला दुजरा देणारी कृत्ये करून हा पक्ष आपले नाव आणि कारकीर्द खराब करत आहेत.