मेरी रॉजर्स “ब्युटीफुल सिगार गर्ल” म्हणून ओळखली जात होती. मेरीचा जन्म १८२० मध्ये झाला होता. तिचा मृतदेह २८ जुलै १८४१ रोजी न्यू जर्सीच्या होबोकेनमधील हडसन नदीत सापडला होता.
मेरी रॉजर्स ही जॉन अँडरसनच्या न्यूयॉर्क शहरातील तंबाखूच्या दुकानात काम करत होती. तिच्या सौंदर्यामुळे दुकानात साहजिकरित्या अधिक ग्राहक आकर्षित होत होते. त्यामुळे मेरीला चांगले पैसे मिळायचे. मेरी दुकानातील बऱ्याच ग्राहकांशी चांगली ओळख ठेवून होती. त्यातल्या काही ग्राहकांना ती आवडायची. त्यातले काही ग्राहक तिच्याशी लाडिकपणे बोलत आणि तीही त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलण्याचे नाटक करीत होती.
५ ऑक्टोबर, १८३८ रोजी न्यूयॉर्क सनच्या एका लेखानुसार मेरी घरातून बेपत्ता झाली होती. मेरीची आई, फोब रॉजर्स यांनी न्यूयॉर्क सनला सांगितले की, तिला मुलीकडून आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. याचे पुरावे म्हणून तिने मेरीने लिहिलेले आत्महत्येचे पत्र सादर केले.
६ऑक्टोबर रोजी द टाईम्स आणि कमर्शियल इंटेलिजन्स या वृत्तपत्राने वृत्त दिले की, मेरी प्रत्यक्षात गायब झालीच नव्हती. मेरी ब्रूकलिनला मित्राला भेटायला गेली होती. जेव्हा मेरी नोकरीवर परत आली तेव्हा अनेकांचा असा विश्वास होता की, तिचे बेपत्ता होणे ही फसवणूक होती. हे सगळे तंबाखूच्या दुकानाच्या मालकाने व्यवसायात वाढ होण्यासाठी पब्लिसिटी स्टंट म्हणून केला असावा.
२५ जुलै १८४१ रोजी मेरी परत बेपत्ता झाली होती. मेरीने मंगळवारी आपला होणारा नवरा डॅनियल पेनेला सांगितले की, ती २५ जुलैला रोजी आपल्या कुटुंबाला भेटायला जाणार होती. मात्र, तीन दिवसानंतर तिचा मृतदेह होबोकेनमधील हडसन नदीतून सापडला. मेरीच्या प्रसिद्धतेमुळे तिच्या मृत्यूला वेगळे वलय प्राप्त झाले होते. राष्ट्रीय स्तरावर खळबळ निर्माण झाली. म्हणूनच स्थानिक वृत्तपत्रांमध्येही ही बातमी जोर धरून होती. या प्रकरणातील प्रसिद्धीमुळे कि काय पण लोकांना तिची खरी कहाणी कळायला मदत झाली.
त्या भागातल्या गर्भपात करणाऱ्या आयाबाई मदाम रेस्टेलने तिचा गर्भपात करून मग तिला नदीत टाकले होते आणि तिच्या गुंगीच्या अंमलाखाली असलेल्या शरीराला मरण्यासाठी सोडून दिले. मेरीचे शरीर परत मिळाल्यानंतर काही महिन्यांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने विष खाऊन आत्महत्या केली.
मेरीचे काय झाले हे खरोखर कोणालाही माहित नाही, अनेकांचा असा विश्वास आहे की, ती सामूहिक हिंसाचाराचा बळी ठरली होती.
फ्रेडेरिका लॉस या एका महिलेनेही सांगितले की, “रेसेलच्या अयशस्वी गर्भपात प्रयत्नातून मेरीचा मृत्यू झाला होता.”
हे प्रकरण कधीच उलगडणारे नव्हते. तिच्या हत्येचे गूढ उकलले नाही तरी, एडगर एलन पो हिच्या "मेरी रोझेट ऑफ मिस्ट्री" मध्ये मेरी रॉजर्सच्या मृत्यूचे गूढ काल्पनिकदृष्ट्या उलगडले आहे.
सत्यात ती केस मात्र एक रहस्यच होऊन राहिली आहे.