ऑलोफ पाल्मे १४ ऑक्टोबर, १९६९ ते ऑक्टोबर १९८६ दरम्यान स्वीडनचे पंतप्रधान होते. स्वीडनचे पंतप्रधान असताना पाल्मे यांनी जागतिक हिवाळी अधिवेशनात सामील असलेल्या अनेक शक्तिशाली राष्ट्रांच्याविरोधात अत्यंत अस्थिर मुद्द्यांबाबत रोकठोकपणे मत व्यक्त केले होते.
विशेषत: व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेच्या भूमिकेसाठी ते सहमत नव्हते शिवाय अमेरिकेने संपूर्ण युरोपमध्ये असंख्य शस्त्रे ठेवली होती, या धोरणाला पाल्माचा विरोध होता. व्हिएतनाम युद्धाच्या अमेरिकेच्या भूमिकेवरील पाल्मे यांच्या टीकेमुळे स्वीडन आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले होते.
अनेकांचा असा अंदाज आहे की, या तणावामुळेच पाल्मेंचा खून झाला. हा खून त्यांच्या रोखठोक मतांचा परिणाम होता.
पाल्में कोणत्याही प्रकारच्या धोक्यात नाही असा विश्वास ठेवून पाल्में यांनी पंतप्रधान असताना त्यांनी आपली बरीचशी कारकीर्द संरक्षकदलाचा आधार न घेता घालवली आहे.
त्यामुळेच २,फेब्रुवारी,१९८६ रोजी साधारण मध्यरात्रीच्या सुमारास, पाम्ले आणि त्यांची पत्नी चित्रपटगृहातून घरी परतत होते. याच वेळात संधीसाधून एका मारेकऱ्याने गोळीबार करून त्यांना ठार केले.
पाल्मेंची पत्नी मात्र या गोळीबारातून वाचली होती. परंतु, पाल्में इतके भाग्यवान नव्हते आणि रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांचा मृत्यू झाला.
स्थानिक चोर आणि अमली पदार्थ व्यसनाधीन असलेल्या एकाला या गुन्ह्यासाठी अटक देखील करण्यात आली व दोषी ठरविण्यात आले. परंतु नंतर त्याचा गुन्हा सिद्ध न झाल्याने त्याची शिक्षा रद्द केली होती.
बरेच लोक असा मानतात की, पंतप्रधानपदाच्या भूमिकेदरम्यान शीत युद्धाबद्दलच्या त्यांच्या रोकठोक मतामुळे पाल्मेची हत्या अमेरिकन सी.आय.ए.च्या सदस्यांनी किंवा कदाचित रशियन के.जी.बी.ने केली होती.
परंतु कोणत्याही सिद्धांताला दुजोरा देईल असे पुरावे अद्याप सापडले नाहीत.
एका जर्मन संस्थेने केलेल्या चौकशीत काही नोंदवलेल्या अहवालांवरून असे दिसून आले होते की, ही हत्या सध्या क्रोएशियामध्ये राहणाऱ्या युगोस्लाव्हियन यू.डी.बी.ए.च्या एका कार्यकर्त्याने केली असावी. तरीही, आजपर्यंत या शोधासंदर्भात फारसे दुवे काही सापडलेले नाही.