1998 साली तिच्या हत्येवेळी सुझान जोविन येल विद्यापीठात शिकत होती. ती 21 वर्षांची होती.
जोविनला कॅम्पसमध्ये चाकूने वार करुन ठार मारण्यात आले होते आणि तिच्या मृत्यूच्या चौकशीत अद्याप एकही वैध संशयित सापडलेला नाही.
सुझान जन्माने जर्मन परंतु एक अमेरिकन विद्यार्थी होती. ती शिक्षक स्वयंसेवक म्हणून रुजू झाली होती. सुझान विद्यापीठाच्या कोरसमध्ये गायची आणि कॅम्पसमधील डेव्हनपोर्ट डायनिंग हॉलमध्ये काम करायची.
तिच्या हत्येच्या रात्री जोविन जुन्या येल कॅम्पसमधील येल पोलिस दळणवळण केंद्राकडे जात होती. तिने मित्राकडून घेतलेल्या कारच्या चाव्या परत करण्यासाठी तिने तिथपर्यंत चालत जाण्याचे ठरवले. तिच्या ध्यानीमनीही नव्हते कि, ही तिची शेवटची रात्र ठरणार आहे.
रात्री साधारण साडे नऊच्या सुमारास, जोवीन तिचा वर्गमित्र, पीटर स्टीनबरोबर जरा मोकळ्या वातावरणात फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडली होती. स्टीनने नमूद केले की जोविनने त्या दिवशीच्या कामांचा काहीच उल्लेख केला नव्हता. ती फक्त खूप थकली होती आणि घरी जाऊन लवकरात लवकर झोपायची खूप आतुरतेने वाट पाहत होती.स्टीनच्या लक्षात आले की जोवीनने हातात कागदाचा काहीसा तुकडा धरला होता. परंतु, ती क्षुब्ध किंवा चिंताग्रस्त दिसत नव्हती. असा जबाब स्टीनने पोलिसांना दिला होता.
पोलिसांना असे वाटले कि, या भेटीनंतर जोवीनने कारच्या चाव्या परत केल्या आणि तिला साधारणपणे रात्री नऊ पंचवीस ते साडे नऊच्या दरम्यान अखेरचे पहिले होते.
तिच्या शेवटच्या दर्शनाच्या वेळी जोव्हिन कॉलेज स्ट्रीटवर ईशान्य दिशेने चालत होती. रात्री दहाच्या आसपास कोणीतरी पोलिसांना फोन केला आणि जवळ-जवळ दोन मैलांच्या अंतरावर एका महिलेला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले होते.
ते शेवटचे जोवीनला जिवंत पाहिले होते. फोन केल्यानंतर पाचच मिनिटांनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जोवीनच्या डोक्यात आणि मानाच्या मागील बाजूस सतरा वेळा वार केले आहेत हे पहिले. जोविनचा घसा चिरला होता. परंतु हे चोरीचे वा लुटीसाठी केल्याची चिन्हे नव्हती. कारण, जोविनचे पाकीट तिच्या खोलीत सुटले होते. रात्री साडे दहा वाजता जोविनला येल न्यू हेवन हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले.
जोवीनच्या हत्येच्या तपासावेळी, डाव्या हाताच्या नखांच्या खाली काही डीएनए आढळले ते कदाचित आरोपीचे असल्याचा अंदाज पोलीस खात्याने लावला होता.
तिचा मृतदेह जिथून सापडला त्याच्या जवळच एका सोद्याच्या बाटलीवर अज्ञात व्यक्तीच्या हाताचे ठसे अर्धवट उमटले होते. जोविनला मारण्याचा प्रयत्न झालेल्या सुरीच्या टोकाचा एक भागही सापडला होता.
जोव्हिनचा मृतदेह जिथे सापडला तेथे जवळच पार्क केलेली एक तपकिरी व्हॅन निरीक्षकांनी पाहिली होती. जोव्हिनचा मृतदेह जिथे सापडला तिथून उलट्या दिशेने पाळणाऱ्या एका पुरुषाबद्द्ल जोविनने ईमेलमध्ये लिहिले होते. हा इमेल तिने तिच्या मृत्यूच्या काही काळआधी पाठविलेला असल्याचे पुरावे आहेत. शिवाय त्यात अज्ञात “एखाद्याचा” उल्लेख केला होता.
जोविनच्या प्रबंध सल्लागारने तिचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी लावला परंतु, तो कधीही दोषी आढळला नाही आणि तिचा खून हा एक न उलगडलेला गुन्हा राहिला.
असे हे जगातील काही न उलगडलेल्या खुनाचे सत्र आता इथे संपते.