अंक पहिला - प्रवेश पहिला - पद १

सुखकर हें होवो मज वाग्वधुवंदन । नाट्यनर्तनीं

काव्य-मयूरा या देखोनी, कविमन, मधुसम गानीं,

गुंगवी नादनंदनी; कंठनृत्य नाचोनि, सरस्वती देई

प्रतिभेसि बहुचलन; हें होवो मज ॥ध्रु०॥

भासे व्योम गायनधाम, कणकण नटलें नादब्रह्म, गातां

बाला; वीणाकांत रमला; एकजीव मग तो होत, रव

न तयाचा कानीं येत, बोले त्याला---"मूका केंवि

झाला, देत प्रेम सवतीला;"--कठोर या बोला झेली

कविजन; सुखकर हें होवो मज ॥१॥


राग यमन, ताल त्रिवट.

("दिर दिर ते नारे तन नारे तदारे दानी," या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel