अंक पहिला - प्रवेश पहिला - पद २
घ्याहो प्याहो सुरा ही सुगंधा । सुरेशा जिंकाया
सुरासेवन वंदा । ही सुरा रणीं देत कंदनीं आनंदा ॥ध्रु०॥
शक्ति हीच दैत्यहातिं, सुरगण तिज सहज भीति,
सुरापन अमरमरण दानवजीवनसाधन; मी धरि या छंदा ॥२॥
राग भूप, ताल दादरा.
("छांडो छांडो जी मोरि कलैय्या," या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.