अंक पहिला - प्रवेश दुसरा - पद १२

मुखचंद्रासि असे, ग्रहण जसे, कच साचे, ओझें मज

केश होतसे, अशुभाचे राहु दिसे ॥धृ०॥

भाले हे मृदुल मुखा, नीरसहो प्रेमसुखा,

कुटिल सकल खल देखा; भासे कच येथ वसे ॥१॥


राग मांड, ताल दादरा.

("नच वृत्तांत पुसे" या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel