अंक तिसरा - प्रवेश दुसरा - पद ४८
कचचूर्ण चाखितां मजा आला,
मनुज पशुसम किं झाला ॥धृ०॥
दिसतो नर हा, मर्कट-लीला;
ऐशा विरोधें मजा आला;
न धरि शृंगा, पुच्छ न अंगा,
नंदी असा हा; मजा आला ॥१॥
राग भैरवी; ताल केरवा.
("नइ जोबनवालिका" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.