नववधु करीश्मा आणि अक्षित घरात दाखल झाले.पाहुण्यांचे आशिर्वाद घेऊन विवाहानंतरचे काही सोपस्कार पुर्ण करुन रात्री झोपायला दोघे वर बेडरूममध्ये आले.
"ये बस पलंगावर, मोठा लाईट बंद करतो.झिरो लाईट लावतो.काय कसं वाटतयं आमचं घर?"
"चांगले आहे,आईबाबा इथेच का राहत नाही?"
"अगं येतात ते अधूनमधून काही दिवस, ते सोड.लग्नाच्या पहील्या रात्री कोण गप्पा मारतं का?",असं बोलुन पुढच्याच क्षणी अक्षितने करीश्माला आपल्या मिठीत घेतले.
एका आठवड्यात सगळे पाहुणे निघून गेले.अक्षितनेपण महाबळेश्वरची तिकीटे काढून आणली होती,त्यामुळे आईबाबापण गावी निघून गेले.करीश्मा रात्री कपड्यांची बँग भरू लागली.
"हा ब्लँक ड्रेस घे,भारी दिसतो तुला आणि तु ना गळ्याशी येतं असं छोटे मंगळसूत्र वापर.ही लांब माळ आवडत नाही मला."
"बरं अजून काही"
"केस मोकळे सोडत जा दिवसभर,छान दिसतात.काय ती वेणी घालते,मला नाही आवडत.",हे बोलताच अक्षितने बेडरूमचे लाईट्स ऑफ केले.
हनीमुनच्या ठीकाणी दोघे फीरत होते.एका ठीकाणी करीश्मा पर्सची कींमत विचारायला थांबली.पर्स सहाशे-सातशेपर्यंत होत्या.दुकान जरा हायफायच होते.कींमत ऐकून दोघेही पुढे निघून गेले.संध्याकाळी अक्षित एकटाच हॉटेलमधुन बाहेर पडला.मेन बाजारात लागणाऱ्या लोकल मार्केटमधून तो कमी कींमतीत पर्स घेऊन आला.
"अहो हे काय,मी नंतर घेतली असती ना."
"आणली ना मी,आवडली का नाही ते सांग फक्त."
पर्स साईजने जरा जास्तच मोठी होती.गावाला येण्याजाण्याची पिशवीच वाटत होती ती.पण अक्षितला राग येईल म्हणून करीश्मा काहीच बोलली नाही. आठ दिवसाचा टुर खुप छान गेला.दोघेही घरी परतले.दुसऱ्याच दिवशी अक्षितच्या एका कलीगकडे पार्टी होती.संध्याकाळी अक्षित घरी आला.
"हे काय तु काहीच तयारी केली नाहीस.आपली लग्नातली ज्वेलरीकाय कपाटात ठेवायला आहे का?"
"नाही हो,गरम होईल खूप दागिने घातले तर.."
"बाकी बायांना कसं होत नाही गरम...अक्षित तोंड वेडेवाकडे करून बोलत होता."
अखेरीस करीश्माने सोन्याचे सगळे दागिने घातले आणि पार्टीचा दिवस पार पडला.घरी येताच अक्षित रात्रीसाठी करीश्माशी जवळीक करू लागला.
"बस हो,रोज रोज काय असतं तुमचं.आज मी थकली आहें.दुपारी आईबाबा आले.त्यांची जेवणे झाली. त्यामुळे माझा दुपारीपण आराम झाला नाही."
"बरं,एक कीसतर घेऊ दे"
"नाही सांगते आहे ना मी.",करीश्मा खेकसलीच.
अक्षित गाल फुगऊन निघून गेला.सकाळ झाली.
"काहो,चहा घ्या"
अक्षितने करीश्माकडे पाहीलेच नाही.करीश्माकडे पाहून फक्त त्याने तोंंड वाकडे केले.
"अहो चहा घ्या ना"
"पहीले माझी रात्रीची इच्छा पुर्ण कर.त्याशिवाय काहीच बोलु नकोस."
"काहीतरीच.आईबाबा आहेत घरात. आज रात्र होणार नाही आहे का?"
"चुप गं,आईबाबा काय मरायला येतील का आपल्या बेडरूममध्ये. गुपचुप उभी रहा इथे."
"अहो पण.."
"चुप ..सांगितले ना.बिलकूल हलु नको.तु जितकी नाही नाही म्हणशील मी तितका जास्त त्रास देईल.लक्षात ठेव.",असं बोलुन अक्षितने त्याची इच्छा पुर्ण करूनच घेतली.
"गोड झालं तोंड आता,चहाची गरज नाही. निघतो मी.आज रात्री मी काहीच ऐकून घेणार नाही हं"
रात्र झाली. करीश्मा कामं आवरून बेडवर बसली.
"हे बघ,माझी कलीग आहे अस्मिता..तिच्या डीपीला नेहमी तिच्या नवऱ्याचेच फोटो असतात. यावरून सिद्ध होतं की तिला तिचा नवरा खुप आवडतो.तु पण कधीतरी माझा डीपी लावत जा ना."
त्यादिवसापासुन जाणीवपूर्वक करीश्मा अक्षितचे डीपी लावत असे.एक दिवस घरी अस्मिताचा फोन आला.जवळजवळ अर्धा तास फोन चालू होता.परत अर्धा तासाने फोन आला.त्यावेळी अक्षित दाढी करत होता.फोन करीश्माने उचलला.
"हँलो,काय हो मँडम.आज सण्डे आहे ना.तरी तुम्ही का फोन करत आहेत.?"
अक्षितने ते वाक्य ऐकताच त्याचा संताप झाला.
"बिनडोक आहेस का गं तु?तुला काही सेन्स आहे का बोलायचा?तिला काही दिवस बाहेर फीरायला जायचयं,म्हणून ती माहीती विचारण्यासाठी फोन करते आहे.",या संवादानंतर जवळजवळ दोन आठवडे अक्षित करीश्माशी बोलला नाही. त्या प्रसंगानंतर करीश्माने कानावर खडाच ठेवला आणि अक्षितसमोर लोकांशी बोलतांना ती संकोच करु लागली.करीश्माच्या प्रत्येक वाक्यावर त्याचे लक्ष असे.बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर असं नको बसु,जास्त नको हसु या सुचनातर चालुच असत.
अक्षित आणि करीश्माच्या लग्नाला दीड वर्ष झाले. एक गोंडस बाळ तन्मय त्यांच्या प्रांगणात आले.पण तन्मयवरून सतत अक्षित करीश्माला बोलत असे.अक्षित खूप हौशी होता.तो सतत करीश्माला बाहेरगावी फीरायला घेऊन जात असे.खुप कमी वयात तो आयुष्यात यशस्वी झालेला होता.त्याच्या घरात तो एकटाच शिकलेला होता आणि मुंबईत राहुन त्याने एवढी प्रगती केलेली होती.त्याचा स्वतःचा फ्लँट होता.फोरव्हीलर होती.मित्रांचा लाडका होता.अतिशय रोमँटिक होता.सतत बायकोला गिफ्ट्स देणे,सरप्राईज देणे चालुच असे.करीश्माला कशाचीही कमी नव्हती.पण ती स्वतः कुठेतरी हरऊन गेली होती.लग्नानंतर पाचसहा वर्षांनी एक दिवस तिची मैत्रिण अदविका घरी आली.
"काय गं,करीश्मा कीती बदलली आहेस तु.संसारी बाई झालीस की गं.काय तुझा फ्लँट,फोरव्हीलर...नवरापण हीरो आहे गं तुझा"
"बस,बस कीती कौतुक करशील?"
तेवढ्यात अक्षित आला.अक्षित येताच करीश्माच्या हालचालींत बदल झाला आणि अद्विकाने तो टीपला.
"हे बघ करीश्मा, मला ना तुझा नवरा प्रेमळपेक्षा खुपच डॉमिनेटींग वाटतो.बाकी तु हुशार आहेसच.निघते मी."
करीश्माला ही गोष्ट लग्नाच्या पहील्या दिवशीच समजली होती पण ती अँडजस्ट करत होती.पण आता तिने बोलायला सुरूवात केली.सकाळ झाली.
"काय गं,काय ही पिवळी साडी घातलीस तु!कीती गावठी कलर आहे हा!"
"राहु द्या,मला आवडतो येलो कलर.समजलं."करीश्माने चहा घेतला आणि टीव्ही समोर जाऊन बसली.
"हे काय, सकाळी सकाळी बोअरींग कीर्तन ऐकतेय."
"डबा तयार आहे.उचला आणि निघा.मला डीस्टर्ब करू नका."
"काय झालयं तुला आज"
"नेहमीच तुमचंच खरं कसं हो.माझ्याही काही आवडीनिवडी आहेत.आपल्या संसारात फक्त तुम्ही आहात. सोफा तुमच्या आवडीचा.देव्हारा तुमच्या आवडीचा.फ्लँटमधील प्रत्येक वस्तु आणायची पण तुम्हीच आणि ठेवायची कुठे हेपण ठरवायचं तुम्हीच.माझे कपडे,दागिने, पर्स....गावाला येणं जाणं...हसणं,बोलणं.....सगळे निर्णय तुमचेच.एखाद्या रात्री जरी तुम्हाला नाही म्हटलं तरी आठ दिवस फुगुन बसतात तुम्ही. नेहमी तुमच्याच कलेने कसं घ्यायचं हो.एकदातरी असं करू का विचारता का तुम्ही?मी कुठे आहे....बाहुली बनऊन टाकली आहे तुम्ही माझी.पण आता मी सोंग घेऊन नाही जगु शकत.तुम्हाला राग आला तरी चालेल.पण तुम्ही पण माझ्या मुळ स्वभावाची सवय करून घ्या.मला तुमच्यासाठी बदलऊ नका.आज आठ वर्ष झाली आपल्या लग्नाला पण माझ्या काळजाची हाक कधी तुम्हाला ऐकुच आली नाही."करीश्मा धाडधाड बोलुन बेडरूममध्ये निघुन गेली.
संध्याकाळी करीश्मा अक्षितची वाट पाहत होती.करीश्माने तेल लाऊन वेणी घातलेली होती.गळ्यातील लहान मंगळसुत्र काढून मोठी माळ घातली होती.अक्षित काहीच बोलला नाही.दोघांनी जेवण केले.तन्मय केव्हाच झोपला होता.करीश्मा पण कामे आवरून बेडरूममध्ये आली.
"बरं,आता कसा मुड आहे तुझा.येते का माझ्याजवळ माझी राणी?रहा तुला जसं रहायचं तसं.मी काही नाही बोलणार यापुढे. ठरलं आजपासुन.",असं बोलताच करीश्मा गालातल्या गालात हसु लागली.
अर्चना पाटील
अमळनेर