अंक पहिला - प्रवेश पहिला - पद २

शांत हरि हास्य धरि; सौख्य झाले जनी ॥ध्रु०॥

शेषशाई जली एकला श्रीपती घेतसे मननसुख, मर्दुनी खला रणी ॥१॥

श्री दिसत त्यागहत, खेदमूर्ती खरी ।

धुंडिता सुरभुवन, नादिसे हरिचरण; द्यावया प्राण, मग चालली सागरी ॥२॥

साहसचि भेटवित देव-चरण क्षणी ।

सेवनी हरी पदीं, श्री, स्वमुख पाहतचि विस्मिता, विकसवी पतिनयन;

त्या क्षणी, शांत हरि हास्य धरि; सौख्य झाले जनी ॥३॥

(राग - मल्हार, ताल - झपताल. 'देखो सखि आज रघुनाथ' या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel