अंक दुसरा - प्रवेश दुसरा - पद २८
सुंदर-मुख ललना, निजजनक-कुल-मना, तनमन नच देई
अधम जना;- सहज असा नियम दावि निजलग्नी,
सदय-ह्रदय विनय-विनत न्यायरत नीतियुत अंगना ॥ध्रु०॥
सुखद लग्न असु-विकसन; नरतनु बलधन कर्मधाम, सुखविलासनी कुशल नाही वधुसमान;
नीकटि गमन धर्म जाण; नयविनयचि पथ विशाल संलग्न ॥१॥
(राग - हमीर, ताल - एकताल; 'दीम् दारा दिर दिर' या चालीवर)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.