राग भूप - ताल त्रिताल
नमुनि ईशचरणा । करिन मग गजाननाच्या पादस्मरणा । नमु० ॥धृ०॥
सुकविरत्नमाला । अतिशोभा दे यदीय सुंदर वृक्षाला ।
जिच्यामध्ये महामणी प्रकाश पाडित सुवर्णपदकी बसोनिया कालिदास राणा ॥नमु०॥
तुम्हा तो शंकर सुखकर हो । हिमधरस्थित विकट काननि तप करी प्रियकरीशुभकरी सुंदरी तिजवरी भुलत निज कैलासनगि तो! शंकर सुखाकर हो ॥धृ०॥
पद्मजा मुररिपुसही अवमानुनी इंद्रा चंद्रा सकला सोडुनी पर्णनी कुंदरदनि सुकुंतलावेणी जाहली शिववरानुसारिणी पर्वताग्रशिरोमणी अर्पि कन्या सद्गुणी हर्षनिर्भर करग्रहणी झाला महादेवास तो । शंकर सुखकर हो । तुम्हा० ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.