जलभरन जात जमुनाके घाटपर, या चालीवर
झाली ज्याची उपवर दुहिता । चैन नसे त्या तापवि चिंता । झाली० ॥धृ०॥
केवि मिळे पति कुलीन सुंदर । लोकप्रिय धनवान जो ज्ञाता । झाली० ॥१॥
सासु श्वशुर दिर जावा नणंदा । छळतिल किंवा करितिल ममता । झाली० ॥२॥
सासरि मग ती कशि वागेल ही । काळजि निशिदिनी पोळवी चित्ता झाली० ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.