दिल छीनलिये, या चालीवर


वैशाखमासि वासंतिक समय शोभला ।
आम्रासव पिउनि गान करिति कोकिला ॥धृ०॥
या जाइजुई मोगरिला बहर तो अला ।
गुंजारव करण्यांत गुंग मधुप जाहला ।
नव पल्लव ते फुटति सकल वृक्षगणाला ।
कुसुमगंधयुक्त मंद वात सुटला । वै० ॥१॥
अति थंडगार चंदनाचि उटी लावुनी ।
वर जातिपुष्प-धवल हार कंठि घालुनी
रमतात युवति चांदण्यात पतिस घेउनी ।
लोका शीतोपचार इष्ट वाटला । वै० ॥२॥
नगरांत लग्नमंडपाचि दाटि जाहली ।
नरनारि नटुनि वीर्थित मिरवित चालली ।
बहु वाद्यगजर दुमदुमुनी गर्दि उसळली ।
दक्षिणार्थ भिक्षुकगण पळत सुटला ।वे०॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel