रान कानडा - ताल त्रिवट
निजरूपी जगदाकृतिभासा कारण होउनि करित विलासा ॥धृ०॥
वस्तुस किरणे छाया ये परी ।
दोहिंस कारण तो रवि जैसा ।निज० ॥१॥
भिन्नाकृति जरि कुंडलवलयी ।
कनकगुणचि दिसतो भरलासा ।निज०॥२॥
निखिल निरंजन निस्तुल तो प्रभु । व्यापक झाला व्याप्यहि तैसा ।निज० ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.