राग कानडा - ताल त्रिवट
सुवर्णकेतकिपरि जो दिसतो वर्ण नव्हे तो दुसरीचा
सडपातळ नाजुक हा बांधा खचित त्याच मृदु देहाचा
पदतल बघता भास होतसे नूतन संध्यारागाचा
कांचिमुळे ओळखता येतो अमुक देश म्हणूनी कटिचा
निर्मुनि जीला कळसचि झाला धात्याच्या चातुर्याचा
तेचि असावे रत्न असा ग्रह झाला इस पाहुनि मतिचा ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.