राग कर्नाटकी - ताल दीपचंदी


कांते फार तुला मजसाठी श्रम सखये पडले ।
योग्य बसुनि मी प्रेमाला तव व्यर्थ सखे मजवरि ते जडले ॥धृ०॥
जरि वरिला असता दुर्योधन । पाहिली तरि असती नेत्रांनी । काय करू तुज शोधू कोठे ।
धैर्य पहा सर्वहि ते खचले ॥कांते॥१॥
"शशिकुलभूषण सदया । मत्प्राणेश्वर विजया ।
विनवी ही तव जाया । मान्य कराया ॥१॥
अर्पियली ही काया । तव चरणी पतिराया ।
ठाउक असुनी हे सखया । त्याजिली का माया ॥२॥
मज दुर्योधनाहाती । द्याया निश्चय करिती ।
बंधू ते नायकिती । बघता अंत किती ॥३॥
समयी नाही आला । देइन मी प्राणाला ।
धाडियलीसे माला । खूण तुम्हांला ॥४॥
"रिपु नेता भार्येसी । सुचली यात्रा कैसी ।
याहुनि होउनि संन्यासी । त्या मज सेवेसी ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel