धन्य दिवस आज वर्णू, या चालीवर
कोण तुजसम सांग मज गुरुराया ।
कैवारी सदया । पाहिजे ते अंगी स्वीकाराया ।
भवदुःख हराया । कोण० ॥धृ०॥
तूचि विष्णु, तूचि शिव, तू धाता । तू विश्वंभरता । तूचि व्यापकव्यापाते प्रसवीता ।
तू मायेप्रता । कोण० ॥१॥
तूचि शिष्या पोसणारी माता । तू विद्यादाता । तूचि देसी तत्त्वनिधी निजहाता ।
तारक बलवंता ॥कोण०॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.