शिव शिव फसलो साजणि येउनि, या चालीवर
व्यर्थ मी जन्मले थोर कुळी । लागला सर्वदा फास गळी ॥व्यर्थ०॥धृ०॥
नच ठावे स्वातंत्र्य कसे ते । बंदित वास मुळी ॥व्यर्थ०॥१॥
गरिबापोटी येते तरि ते । मज नच देते बळी ॥व्यर्थ०॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.