जो चिदानंदकंद, या चालीवर


वद जाउ कुणाला शरण करी जो हरण संकटाचे ।
मी धरिन चरण तयाचे । अग सखये । मी धरिन० ॥धृ०॥
बहु आप्त बंधु बांधवा प्रार्थिले कथुनि दुःख मनिंचे ।
ते होय विफल साचे । अग सखये । ते होय वि० ।
मम तात जननि मात्र ती बघुनि कष्टती हाल ईचे ।
न चलेचि काहि त्यांचे । अग सखये ॥च चले०॥
जे कर जोडुनि मजपुढे नाचले थवे यादवांचे ।
प्रतिकूल होति साचे । अग सखये ॥प्रति०॥
रुचती का तीर्थयात्रा या समयी त्यास ती ।
मजवरची प्रेमबुद्धि का हरिची लोपती ।
दादांना अंधजांची भक्ति का लागती ।
या कृत्या साह्य होती का वहिनी रेवती ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel