अहा हे कृष्णा मुकुंदा, या चालीवर
अरसिक किति हा शेला ।
त्या सुंदर तनुला सोडूनि आला
अर० ॥ध्रु०॥
प्रेमे प्राणपतीला । मी संतोषे हा अर्पण केला ।
दुर्मिळ जे स्थळ मजला ।
ते सहज मिळुनि या दुर्भाग्याला । तेथुनि का हा ढळला ।
त्या सत्संगतिला कैसा विटला । कोंडुन ठेविन याला ।
मज दृष्टीस नलगे निष्ठुर मेला ॥अर०॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.