दक्ष वदे हा देव कशाचा, या चालीवर
लाल शालजोडी जरतारी झोकदार शिरि बांधोनी ।
नाचत चाले जैसा येतो रंगभूमिवर नट सजुनी ।
वाजे कडकड छाटि गुलाबी माळ जपाची करि धरुनि ।
ध्यान धरुनि बैसता दिसे मज दांभिकपण वर ये फुटुनि ।
सर्वांगावर भस्माचे ते पुंड् लावि किति रेखोनी ।
त्यावरि रुद्राक्षांच्या माळा घालितसे तरि किती जपुनी ।
स्फटिकाची ती सुबक कुंडले डुलताना हलती कानी ।
पायि खडावा चटचट करिती दंड शोभती करि तीन्ही ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.