बिडोरंगा ह्यरलू; या कर्नाटकी चालीवर ताल - दादरा
नच सुंदरि करु कोपा । मजवरि धरि अनुकंपा ।
रागाने तव तनु ही पावत कशि कंपा । नच० ॥ध्रु०॥
नारी मज बहु असती । प्रीती परि तुजवरती ।
जाणसि हे तू चित्ती । मग काही अशि रीती ।
करि मी कोठे वसती । तरि तव मूर्ती दिसती (चाल)
प्रेमा तो मजवरिचा नेउ नको लोपा ॥नच०॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.