राग - भूपाळी ताल - दादरा
प्रिये पहा रात्रीचा समय सरूनि येत उषःकाल हा ॥धृ०॥
थंडगार वारा सुटत । दीपतेज मंद होत ।
द्विग्वदने स्वच्छ करित । अरुण पसरि निज महा ॥प्रिये०॥१॥
पक्षि मधुर शब्द करित । गुंजारव मधुप वरिति ।
विरलपर्ण शाखि होति । विकसन ये जलरुहा ॥प्रिये०॥२॥
सुखदुःखा विसरुनिया । गेले जे विश्व लया ।
स्थिति निज ती सेवाया । उठले की तेच अहा ॥प्रिये०॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.