राग भैरवी; ताल धुमाळी.
किती मजेदार हार; शिवभययुवतिशरण मदन रचि सुमन नानाकार ॥ध्रु०॥
येत हा मदनमित्र रणाला; सैन्य तया अबलाकरमाला ।
फुले फूल; पडे भूल; दानशूर मनीं चूर ।
वसंतसेना सरसावे ही; बैरागी समुदायीं होई हो हाहाःकार ॥१॥
तोडूया मुकुल सकल कुमारि; रास रचू या रुद्रमंदिरीं ।
पहा हार, हारा भार; ज्ञानलोचन झांकी मार ।
नाचे कुसुमायुध आनंदें, पुष्पवती शिवसमाधिसामोरा तोरा फार ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.