भावना मनाचा तू जाणून घेशील का,
एकदा सांग ना तू माझा होशील का
प्रत्येक क्षण माझात तू रमून जाशील का,
एकदा सांग ना तू माझा होशील का
हृदयात तुझ्या तू मला जागा देशील का,
एकदा सांग ना तू माझा होशील का
आयुष्यभरासाठी माझा हातात घट्ट धरशील का,
स्वप्नात का होईना, पण एकदा सांग ना तू माझा होशील का
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.