व्यक्तींच्या योग्य मतांची आणि त्यांच्या विचारसरणीची काळजी असलेले व्यक्ती समोरच्याचा विचार करून मगच आपले मत प्रदर्शित करतात. ते समोरच्या व्यक्तीच्या मतांचा सारासार विचार करतात.  दरवेळी हे गरजेचे नाही कि आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक मतावर सहमत असाल. सहमत होण्यापूर्वी आपण पडताळून पहिले पाहिजे कि समोरची व्यक्ती जे काही करत आहे किंवा त्यांचे विचार मांडत आहेत हे नक्की त्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी आहेत कि नाही.  

समोरच्या व्यक्तीच्या मते चांगले वाटणारे विचार त्याला वाईटाकडे नेणारे असतील तर आपण त्यांच्या काळजीपोटी ते सुधारण्याचा प्रयत्न करावा. हे एका दृढनिश्चयी व धोरणी माणसाचे गुण आहेत. आपण बऱ्याचदा असे ऐकले आहे कि खरे सवंगडी, मित्र, मैत्रिणी आपल्याला नेहमी चांगले मार्गदर्शन करतात. आपल्यातल्या वाईट विचारांचे निर्मुलन करायचा प्रयत्न करतात. परंतु दुर्दैवाने, बऱ्याच लोकांचे असे “खरे” सवंगडी, मित्र, मैत्रिणी नसतात किंवा त्यांच्या सवंगडी, मित्र, मैत्रिणींना खरोखर त्यांची काळजी नसते.

आपण एखाद्यासाठी खरोखरीच महत्वाचे आहात हे समोरच्या व्यक्तीच्या वर्तवणुकीतून कळते. आपण अगदी कमी वेळात त्या व्यक्तीच्या आयुष्यात एक उच्च स्थान मिळवता. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची खरोखर काळजी करता तेव्हा आपण त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल जास्त काळजी घेता. एखाद्याचे मनापासून आदर व काळजी करणे म्हणजे त्यांची सर्वोत्तम आवड आणि त्यांचे सर्वोत्तम भविष्य हे त्यांच्या तत्कालीन अस्वस्थतेपेक्षा चांगले  करण्याचा प्रयत्न करणे. तसेच तापण स्वतःला त्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवून विचार करणे. 

कधी कधी असे होते कि आपण आपले हित - अहित समजू शकत नही आणि आपल्या नाशाकडे वाटचाल करतो. यावेळी आपले खरे मित्र किंवा आपला आदर करणारी व्यक्ती ही आपल्या हो ला हो करत नाही. ते आपण नाराज झालो किंवा रागावलो तरी ते आपली साथ सोडत नाहीत. आपणही इतरांशी असेच वागायला हवे.

नक्कीच, असे लोकंही आहेत जे आपले वाईट घडणार आहे असे माहिती असूनही  त्याबद्दल खोटे बोलतात. काही लोकांना स्वत:बद्दलचे सत्य माहित करूनघेण्यात र्स नसतो. कारण त्यांचे सत्य जाणून घेतल्यास त्यांचेच प्रतिबिंब, त्यांच्या कृती या कदाचित जीवनात फार मोठे परिवर्तन घडवून आणतील जे त्यांना त्यावेळी नको असते. ते त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने आवश्यक असते. बरेच लोक सत्य नकारात जगतात. ते दुर्दैवी आहे. एक दृढनिश्चयी व्यक्ती असे करत नाही. ती व्यक्ती आपल्यात चांगले परिवर्तन घडवून आणते.

परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, एखाद्याचा खरोखरच आदर आहे ,त्यांचे जीवन आणि त्यांचे भविष्य याची काळजी घेणे ही दृढनिश्चितेची पूर्व अट आहे. तुम्ही खरच एखाद्या व्यक्तीचा आदर करत असाल तर तुम्ही त्यांना आदरपूर्वक सांगाल पण जर तुमच्या मते त्या व्यक्तीचे काहीच मुल्य नसेल तर त्याच्या बोलण्याचा व वागण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel