अंतर्मुख व्यक्तींसाठी नवीन मित्र-मैत्रिणी बनवणे अवघड काम असू शकते, परंतु ते निश्चितच फायद्याचे आहे. तरीही, मित्र-मैत्रिणी आपल्यापैकी बहुतेकांसाठी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होतात. एकत्रित आयुष्यासह जीवन जगणारे, चढउतार आणि वेदना आणि आनंद सामायिक करणारे तेच आहेत. मित्रांशिवाय जीवन हे सुने सुने वाटते. आपल्या आयुष्यात मित्र-मैत्रीण नसतील तर आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे कदाचित नसू. आपले मित्र-मैत्रिणी आपल्याला योग्य मार्गदर्शन देतात, आपले दुखः समजून घेतात. या सगळ्यासाठी आपल्या आयुष्यात कुणीतरी मित्र-मैत्रीण हवे. ते कसे काही मिळवाल याच्या टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.