तुमची भीती तुमच्या डोक्यात आहे हे लक्षात घ्या:
पहिली पायरी म्हणजे नवीन लोकांना भेटण्याची निर्मळ मानसिक प्रतिमा विकसित करणे. आपल्यापैकी काहीजण नवीन लोकांना भेटायला एक धडकी भरवणारा कार्यक्रम म्हणून पाहतात. तुमच्याबद्दल समोरच्याला चांगली भावना असेल कि नाही ही चिंता तुम्हाला नेहमीच असते, की समोरच्या व्यक्तीला आपण आवडू की नाही, संभाषण कसे चालू करायचे आणि यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतील.
आपण याबद्दल जितका विचार करतो तितकेच ते आधीच भयानक किंवा अवघड वाटते. ही प्रारंभिक भीती मानसिक भीतीमध्ये विकसित होते, जी आपले आयुष्य नकळत खराब करते. तुम्हाला नवीन मित्र करण्यापासून थांबवते. इतरांबद्दल लाजाळूपणा खरोखर एक चिंतेची बाब आहे.
वास्तविक, या सर्व भीती किंवा चिंता फक्त आपल्या डोक्यात असतात. आपण त्याबद्दल खूप जास्तच विचार करतो , यामुळे ९९% लोक स्वत:कडे लक्ष देत नाहीत. काही लोकं या गोष्टींबद्दल काळजी करण्यात स्वतःला खूप व्यस्त करून घेतात. तुम्हाला स्वतःची छाप इतरांवर काय पडेल याची काळजी वाटत असते, कदाचित समोरच्याच्या ही भावना सारख्याच असतील.
खरं सांगायचे तर, ते ही तुमच्याइतकेच घाबरलेले असतील. उर्वरित १% लोक स्वतःचे संबंध काही विशिष्ट ठोकताळ्यांवर किंवा मूल्यांवर आधारित ठरवतात. ही लोकं तुम्ही काय बोलता, काय विचार करता यावर तुमच्याशी मैत्री करायची कि नाही हे ठरवतात. आपल्या ओळखीत आपल्याशी मैत्री करू इच्छित असे काही लोक आहेत का??