सिगारेट किंवा विडी ओढल्यामुळे गर्भवती तसेच गर्भाला अपाय होतो हे चांगले माहीत असले तरीही धूम्रपान करणार्याय महिलांपैकी फक्त 20% प्रत्यक्ष गर्भारपणात धूम्रपान सोडतात. गर्भावस्थेत धूम्रपान केल्यास गर्भावर ठळकपणे दिसणारा परिणाम म्हणजे नवजाताचे वजन अत्यंत कमी असणे. गर्भवती जितके जास्त धूम्रपान करेल तितक्या प्रमाणात नवजाताचे वजन कमी होत जाते. गर्भावस्थेत धूम्रपान करणार्यांरनी जन्म दिलेल्या बाळांचे वजन, धूम्रपान न करणार्यांनी जन्म दिलेल्या बाळांच्या वजनापेक्षा सुमारे 170 ग्रॅमने कमी असते. दीर्घकाळ धूम्रपान करणार्यां महिलांच्या नवजातांचे वजन अधिकच कमी भरते असे दिसते.

धूम्रपान करणार्याे महिलांच्या नवजातामध्ये हृदय, मेंदू व चेहर्या ची जन्मजात व्यंगे असण्याचे प्रमाण, धूम्रपान न करणार्याय महिलांच्या नवजातांच्या तुलनेने जास्त असते. तसेच नवजाताच्या अचानक मृत्यूचे (सडन इंफंट डेथ सिंड्रोम - SIDS) प्रमाण वाढू शकते. नाळेची जागा बदलणे (प्लॅसेंटा प्रीव्हिया), वेळेआधीच नाळ तुटणे, गर्भ असलेले अर्धपटल (मेंब्रेन) वेळेआधीच फाटणे, कळा आधीच सुरू होणे, गर्भाशयाचा जंतुसंसर्ग, गर्भपात, मृत मूल जन्माला येणे, वेळेआधीच जन्म होणे इ. बाबींची शक्यता वाढते. ह्याशिवाय, धूम्रपान करणार्याय महिलांची मुलांचा शारीरिक, बौद्धिक तसेच वर्तणूकविषयक विकास इतर मुलांच्या मानाने किंचित परंतु जाणवण्याइतपत कमी असतो. हे परिणाम बहुधा धुरातील कार्बन मोनोक्साइड आणि निकोटिनमुळे होत असावे. गर्भवतींनी इतरांकडून त्यांच्याकडे येणारा धूरदेखील (सेकंडहँड स्मोक) टाळावा कारण त्यामुळेही गर्भावर असेच घातक परिणाम होऊ शकतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel