देवाची रूपरेखा,
ज्यात दिसला मला हरी,
जगाने केली निंदा
त्याने दिली शिदोरी,
श्रीमंत मन आहे,
ग़रीबी असली जरी,
दु:खवलं अनेकांनी,
ताकद मात्र आहे उरी,
नाही लुटण्यची इच्छा,
खातों कष्टाची भाकरी,
दुनिया प्रकाश मय झाली,
अंधार त्याच्या घरी,
जगाचा पोशिंदा
सर्वाचे पोट भरी,
चिमटा पोटाला देवून
उपाशी मरी,
जगाला जगवून
गळ्यात घ्यावी लागते,
कास-याची दोरी,
सांगा कुणाला कळली
आजपर्यत
शेतक-याची कामगिरी?
जगाला देतो गोडवा,
दु:ख त्याच्या पदरी,
जाच्यांत दिसला देव,
तो माणूस शेतकरी...
महेश नामदेव तिवाडे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.