पाऊस अलगद पडावा
त्यात आपण चिंब भिजावं,
संपूर्ण जगाला विसरून
सुंदर निसर्गाला अनुभववावं.
नदीकडे पाहून वाटतं
आपणही संथ वहावं,
आकाशातल्या पक्ष्यासारखं
सॄष्टीविहार करावं.
फुलाप्रमाणे आपणही
सर्वांना खूश करावं,
पानांवर पडणार्या दवासारखं
खूप खूप चमकावं.
सूर्यप्रकाशासम क्षितिजावर
तेजस्वीपणे पसरावं,
पाखरासारखं मनमुराद
इकडे-तिकडे बागडावं.
चंद्र-चांदण्यांशीही
खूप काही बोलावं,
निसर्गाशी समरस होउन
त्यातचं मिसळून जावं.
समुद्रासारखं अफाट व
विस्तृत व्हावं,
पर्वताप्रमाणे खंबीर
उभं राहावं.
खरंच.., वाटतं कधी-कधी
स्वतःलाच विसरून,
फक्त या अवर्णनीय
निसर्गालाच न्याहाळावं.....
सानिका सुतार
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.