धर्म ही अफूची गोळी आहे असे मार्क्स म्हणत असे. धर्माच्या नावाखाली जगात एवढा रक्तपात हिंसाचार झालेला आहे की दोन महायुद्धामध्येही तेवढा रक्तपात झालेला नाही .धर्म म्हटला की माणूस काहीही विचार करायला किंवा ऐकायला तयार नसतो. दुसऱ्या धर्माच्या बाबतीत किंवा वेगळ्या विचारांच्या बाबतीत तो हट्टी आग्रही व प्रसंगी क्रूरही होतो .कोणाला तरी विशिष्ट परिस्थितीमध्ये काही ज्ञान झाले व आनंदाचा ठेवा मिळाला हा ठेवा इतरांना मिळवा म्हणून त्याने त्याला शब्दरूप दिले.त्याला अनुयायी मिळत गेले व अशा प्रकारे तो धर्म संस्थापक म्हणून ओळखू जाऊ लागला कर्मकांडाला फार महत्त्व निर्माण झाले व या बाबतीत कोणतीही तडजोड न करण्याची मानसिकता निर्माण झाली त्यांच्या अनुयायांनी व इतरांनी या कर्मकांडांमध्ये अधिक अधिक भर टाकली आणि अशाप्रकारे एक अपरिवर्तनीय साचा निर्माण झाला कोणत्याही धर्मामध्ये अशाप्रकारे आचाराला महत्त्व व विचारांकडे दुर्लक्ष होऊ लागले .
समाजवाद साम्यवाद भांडवलशाही इत्यादीमध्ये ही धर्माप्रमाणेच कठोरता व कडवेपणा निर्माण झाला . त्यासाठीही रक्तपात व युद्धे झाली
धर्म म्हणजे समंजसपणा सहानुभूती सहसंवेदना प्रेम आपुलीक इत्यादी या ऐवजी लोक जास्त असमंजस कडवे व दुष्ट होऊ लागले . परस्परांपासून दूर जाऊ लागले .
परमेश्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात आपलाच मार्ग बरोबर असा आग्रह चूक आहे.आपल्याला अमुक अमुक मार्ग म्हणजे धर्म चांगला असे मनावर लहानपणापासून बिंबवले गेले आणि त्यातून अापण आग्रही व कर्मठ बनलो .परमेश्वर भेटला तरी आपण कल्पनेने जो सांगाडा तयार केला तसाच तो असेल म्हणजेच परमेश्वर ही आपली निर्मिती असेल .अमर्याद अनंताचा साक्षात्कार आपल्याला मर्यादेतून होणार नाही .मनी जे वांछे ते स्वप्नी दिसे एवढेच नव्हे तर ते प्रत्यक्षातही दिसे असे म्हणता येईल.
ही सर्व प्रक्रिया जर आपल्याला मनःपूर्वक समजली म्हणजे खर्या अर्थाने उमजली तरच आपला अहंभाव कमी होईल किंवा नष्ट होईल तेच खऱ्या अर्थाने परिवर्तन असेल त्यातूनच योग्य समज अलिप्तता साक्षित्व निवड रहित जागृतता अस्तित्वात येईल त्यानंतर काय होईल हे सांगता येणार नाही कारण ते कल्पनाबाह्य असेल
प्रभाकर पटवर्धन
प्रतिक्रिया देणे अवघड आहे का?नक्कीच अवघड आहे.मी एकदा दिलेली प्रतिक्रिया अॅपने घेतली नाही.मला ठोकरून लावले.प्रतिक्रिया वाचली की लेखकाला बरे वाटते.कांही जण वाचतात सोडून देतात.सर्वच वाचक वाचून सोडून देत असतील असे वाटत नाही.कोण चुकत आहे?लेखक वाचक कि प्रतिक्रिया देणारा?मी गोंधळलेला आहे.मज पामराचा गोंधळ कुणी दूर करील काय?अॅपमध्ये तर काही त्रुटी नाही ना ?