सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय परिस्थितीनुसार प्रत्येकाची धारणा बनत असते सामाजिक पातळीवर नेहमीच निरनिराळया चौकटी असतात या चौकटी चिरंतन नसतात या चौकटी म्हणजे अंतिम सत्य नव्हे काळानुसार व समाजानुसार या चौकटी बदलतात धारणेनुसार विचार व विचारानुसार कृती होत असते हे एकदा समजले म्हणजे टीका करण्याची दोष देण्याची गुणगानाचि वृत्ती आपोआपच नाहीशी होते या सर्वांमध्ये एक अपरिहार्यता आहे या सर्वाची जाण आली म्हणजे आपोआपच निवड रहित जागृतता निर्माण होते त्यामुळे परमसमाधान प्राप्त होते भक्तीमध्ये सर्व गोष्टी विठ्ठल चरणी परमेश्वर चरणी अर्पण करणे म्हणजेच ही अवस्था होय
१९/४/२०१८© प्रभाकर पटवर्धन
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.