एका आश्रमात मध्यरात्री कोणीतरी संताचा दरवाजा ठोठावला. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला, तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा एक शिष्य त्यांच्या समोर पैशांनी भरलेली थैली घेऊन उभा आहे.
शिष्य म्हणाला, "स्वामीजी, मला हे धन दान करायचे आहे.”
हे ऐकून संत आश्चर्याने म्हणाले, “पण हे काम सकाळीही करता आले असते."
शिष्य म्हणाला, "स्वामीजी, तुम्हीच समजावून सांगितले आहे की मन खूप चंचल आहे. जर तुमच्या मनात चांगले विचार आले तर क्षणभरही उशीर करू नका, ते काम लगेच करा. पण काही वेळा मनात वाईट करण्याचे विचार आलेच तर ते कृत्य करण्याआधी शंभरदा विचार करा. मला असेही वाटले की मी सकाळपर्यंत माझे मत बदलू नये, म्हणून मी तुमच्याकडे आताच आलो."
शिष्याचे शब्द ऐकून संत खूप प्रसन्न झाले. त्यांनी शिष्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि ते म्हणाले, "जर प्रत्येकाने हि गोष्ट पूर्णपणे आचरणात आणली तर तो वाईट मार्गाला कधीच लागू नाही आणि तो कधीही अपयशी होऊ शकत नाही."