बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे , व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्हास झाल्यामुळे बर्याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही . पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास या प्रयोगामुळे संस्कृत सुभाषिते माहीत होतील .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल
नलिकागतमपि कुटिलं न भवति सरमालं शुनः पुच्छम् |
तद्वत् खलजनहृदयं बोधितमपि नैव याति माधुर्यम् ||
[ज्याप्रणे] कुत्र्याचे वाकडे शेपूट नळीत घातले तरी सरळ होत नाही, त्याप्रमाणे दुष्ट मनुष्याचे मन उपदेश करूनही मधुर [चांगले] होत नाही.
या सुभाषितातील पहिला चरण महत्त्वाचा आहे .परंतु लक्षात ठेवण्यास कठीण आहे(सरलं शुन:पुच्छम्)एवढाच भाग लक्षात ठेवणे सहज शक्य आहे .मराठी म्हण आपल्या नेहमीच्या ओळखीची आहे .(कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच )एखादा मनुष्य हट्टी आग्रही रागीट असेल, कोणत्याही भावना जर तीव्र स्वरूपाच्या असतील, जरी त्या चांगल्या असल्या, तरीही त्या शांत करणे कठीण असते .जोपर्यंत नियंत्रण आहे तोपर्यंत त्या भावना नियंत्रित राहतील परंतु नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे होईल.सुभाषितामध्ये म्हटल्याप्रमाणे केवळ दुष्ट प्रवृत्तीच नव्हे तर कोणत्याही तीव्र भावना काबूत आणणे सरळ करणे कठीण अशक्य असते .अशा प्रकारच्या कोणत्याही प्रसंगात
स्मरणीय
-सरलं शुन: पुच्छम्---
२१/८/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com