बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे , व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्हास झाल्यामुळे बर्याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही . पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास या प्रयोगामुळे संस्कृत सुभाषिते माहीत होतील .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल
व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रुसङ्कटे |
राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः ||
आनंदाचे प्रसंगी, दुष्काळात, शत्रूने हल्ला केला असता, राजदरबारात, स्मशानात [म्हणजे सर्व सुख, दुःखाच्या वेळी] जो आपल्या जवळ राहतो तो [खरा] बांधव होय.
या सुभाषितामधील -- राजद्वारे श्मशाने च-- हा भाग महत्त्वाचा आहे . लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे .कोणत्याही चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत खरा मित्र बंधू सोडून जात नाही .याचा व्यत्यासहि सत्य आहे .जो संकटात सोडून जातो तो मित्र नव्हे .बंधू म्हणजे मित्र स्नेही असा अर्थ आहे .
स्मरणीय
राजद्वारे स्मशानेच
२१/८/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com