एकदा संत रामदास एका जंगलातून मार्गक्रमण करत जात होते. त्यांच्या मागे एक दुष्ट माणूस त्यांना शिव्या देत चालला होता. संत रामदास त्याला काहीही न बोलता शांतपणे पुढे चालत जात राहिले.
जेव्हा जंगल संपले आणि गाव दुरून दिसत होते, तेव्हा संत रामदास तेथील एका हनुमान मंदिराजवळ थांबले. मग प्रेमाने त्या माणसाला म्हणाले, "भाऊ, आजची रात्र मी इथेच राहतो आहे. तू मला हवी तितकी मनसोक्त शिवीगाळ करू शकतोस."
हे ऐकून तो दुष्ट माणूस खूप आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, "असे का?"
संत रामदास म्हणाले, "कारण पुढे गाव आहे. तेथील लोक माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. जर तुम्ही मला त्यांच्या समोर शिव्या दिल्यात, तर ते सहन करू शकणार नाहीत आणि ते तुम्हाला मारहाण करू शकतात."
त्या माणसाने आश्चर्याने विचारले, "मग त्यामुळे तुम्हाला काय फरक पडतो?"
संत रामदास यांनी त्याला समजावून सांगितले, "जर तुम्हाला त्रास दिला गेला तर मला दुःख होईल. चार पावले, जर कोणी संताचे अनुसरण करते, तर संताचे हृदय त्याचे कल्याण चिंतू लागते. तू तर अनेक कोस माझे अनुसरण करतो आहेस त्यामुळे मला तुझ्या बाबत जिव्हाळा निर्माण झाला आहे."
संत रामदास यांचे हे शब्द ऐकल्यावर दुष्ट माणूस त्यांच्या पाया पडला आणि हात जोडून माफी मागितली