Bookstruck

आध्यात्मिक कमाई

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका गावात दोन तरुण राहत होते. एक सत्संग प्रेमी होता, तर दुसऱ्याचा ऋषी मुनींवर विश्वास नव्हता.

एके दिवशी एक महात्मा गावात आला. सत्संग प्रेमी तरुण त्यांच्याकडे जाऊ लागला. त्याने त्याच्या मित्रालाही सोबत येण्यास सांगितले. त्याच्या मित्राला वाटले की आज या महात्माजींची परीक्षा झाली पाहिजे. असा विचार करून तोही त्याच्याबरोबर  गेला.

महात्माजींकडे पोहचल्यावर तो म्हणाला, "काय महाराज? संसार झेपला नाही, प्रपंचाची कर्तव्य पार पाडता आली नाहीत आणि म्हणून साधू झालात, बरोबर न?. आम्हाला संसारी लोकांना बघा किती मेहनत करावी लागते, मग आमचे पोट भरते आणि तुमच्यासारखे साधू म्हणवून घेणारे मात्र फुकटच खाता."

हे ऐकून महात्माजी हसले आणि म्हणाले, "आम्ही आध्यात्मिक कमाई करतो. जे काही आम्ही लोकांनी दिलेले  खातो, ते आम्ही उपदेशाच्या स्वरूपात त्यांना व्याजासह परत करतो. ते मोफत अन्न नसते."

महात्म्यांचे हे शब्द ऐकून तो तरुण निरुत्तर झाला.

« PreviousChapter ListNext »