एके दिवशी मी गावाकडच्या शेताकडे चालत होतो. तेव्हा रस्त्यामध्ये एका खळ्यात एक बुजगावणे उभे केले होते. मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला विचारलं.
“काय रे या शेतात इकडे रानात एकट्याला उन्हा पावसात उभं राहून कंटाळा येत असेल न एकदम?”
एकदा एका बुजगबाहुल्याला मी म्हणालो, “या निर्जन शेतात उभे राहण्याचा तुला अगदी कटाळा येऊन गेला असेल नाही!"
त्यावर ते मला म्हणाले, “ नाही रे,दुसऱ्यांना घाबरवण्याची मजा काही औरच आहे.त्यातून मिळणारा असुरी आनंद तर काय विचारूच नकोस. त्याचा मला कधीच कंटाळा येत नाही.”
हे त्याचे बोलणे ऐकून मी क्षणभर विचारात पडलो आणि मग म्हणालो, “ हो हो अगदी खरं बोलतोयस. मी हि तो आनंद अनेक वेळा अनुभवला आहे.”
“ज्यांच्या शरीरात फक्त भुसा आणि पेंढा भरला आहे त्यांनाच हा आनंद कळू शकतो.”
मला त्याच्या म्हणण्याचा अर्थ नीटसा कळला नाही. त्याने माझे कौतुक केले कि खिल्ली उडवली हेच मला समजले नव्हते. मी त्याचा निरोप घेतला.
एक वर्ष गेले. मी पुन्हा गावाकडील शेतावर निघालो होतो. आता ते बुजगावणे सामान्य बुजगावणे राहिले नव्हते. त्याचे एका उपदेश देणाऱ्या प्रकांड पंडितात रुपांतर झाले होते.
मी कुतूहल म्हणून त्याच्या जवळ गेलो. पाहतो तर काय तो चक्क उपदेशाच्या गोष्टी सांगत होता.
त्याच्या टोपीच्या खाली असलेल्या मडक्याच्या छिद्रात कावळा आणि कावळीण राहत होते. त्या मडक्यात घरटे बांधून त्यांनी अंडी घातली होती.