सन १६७५ साली शिवशाहीत वायगाव येथे गणेशची ही मूर्ती जमिनीत सापडली. या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली.

पुराणकाळात दधिची, जमदग्नी, इत्यादी ऋषीमुनींनी ही तापस भूमी मानली जाते. विदर्भातील हे आद्य गणेश पीठ समजले जाते.

पद्मासनाधीष्ठीत ही मूर्ती गणेश आणि रिद्धी-सिद्धी सहित आहेत. ही मूर्ती आकर्षक आहेत.

अश्विन- कार्तिक महिन्यात देवावर सूर्यकिरणे पडतात. यावेळी येथे दर्शनाकरिता गंडा बांधण्यात येतो.

अमरावती-परतवाडा रस्त्यावर २९ किमी. असलेल्या या वायागावत बसने जाता येते.

मुंबई हुन येथे जायचे झाल्यास मुंबई-बडनेरा या रेल्वेने जाता येते हा प्रवास ६७० कि.मी चा आहे.
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel