ओझरचा विघ्नेश्वर हा अष्टविनायक अष्टविनायकातील एक महत्त्वाचे गणेशस्थान आहे.
पुणे नाशिक रस्त्यावर नारायणगावपासून आठ किलोमीटर अंतरावर ओझर हे गाव आहे.
पुण्याहून जुन्नरला जाऊन नंतर रिक्षा किंवा बसने ओझरला येता येते. पुण्याहून ओझरला येण्यासाठी बसेस आहेत.
१७३९ साली वसई स्वारी फत्ते करून चिमाजी अप्पा श्रींच्या दर्शनासाठी येथे आले होते आणि त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
माघी व भाद्रपद चतुर्थीला सोबतच कार्तिकमधील त्रिपुरारी पौर्णिमा व चतुर्थीला येथे उत्सव साजरा होतो.
गणेशाने विघ्नासुरांबरोबर येथेच युद्ध करून त्याला नामोहरम केले होते.
त्यामुळे येथील गणेशाचे नाव विघ्नेश्वर झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.