पेशव्यांचे सरदार गोखले यांनी १७६२ मध्ये वाईत कृष्णेच्या पाताळात पूर्वाभिमुख असे हे श्रीमहागणपतीचे मंदिर बांधले होते.
या मंदिराला भरपूर कमानी आणि दारं आहेत मूर्तीचा आकार अजस्त्र असल्याने याला ढोल्या गणपती असेही नाव आहे.
सात फूट उंच आणि सहा फूट रूंद अशी ही मूर्ती आहे. शिवाय प्रभावळ बारा फूट उंच आणि ढोलासारखा मोठे पोर्ट अशी आहे
त्यामुळे ही मूर्ती महाकाय वाटते. १६९१ साली वैशाख शुद्ध त्रयोदशीला येथे देवाची स्थापना झाली
तो दिवस थाटामाटात उत्सव स्वरूपात साजरा केला जातो भाद्रपदात सात दिवस येथे उत्सव असतो.
पुणे बेंगलोर रस्त्यावर साताऱ्याच्या आधी पांचवड असे गाव लागते तेथून वाई महाबळेश्वर पोलादपूर असा फाटा आहे.
सातार्यापासून सुमारे एक तासाच्या अंतरावर वाई हे गाव आहे. येथे मंदिराची स्थापना केली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.